गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास पोलीस प्रशासनाने परवानगी दिली आहे.

केळकर बाग परिसरातील व्यापारी संघटनेच्या मागणीची दखल घेत पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. रात्री १० नंतरही बाजारात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी दुकाने उघडी ठेवण्याची मागणी पोलीस उपआयुक्त नारायण भारमणी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती.

पोलीस प्रशासनाच्या या निर्णयामुळे रात्रीच्या वेळी बाजारपेठेत खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरळीत चालण्यास मदत होणार असून व्यापारी व ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
निवेदन देतेवेळी भाजप नेते धनंजय जाधव यांच्यासह शहरातील प्रमुख व्यापारी उपस्थित होते. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांनी दिले आहे.


Recent Comments