पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावरील कारवाईमागे राजकीय उद्देश असल्याचा आरोप उत्तर बेळगावचे काँग्रेस आमदार आसिफ सेठ यांनी केला आहे. विरोधकांची वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळी यांच्यावर चालणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना आमदार आसिफ सेठ म्हणाले, की सतीश जारकीहोळी हे संपूर्ण राज्याचे नेते आणि उद्योगपती आहेत. निवडणुकांच्या काळात अशा प्रकारचा राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न होत असतो, पण त्याला तोंड देण्याची ताकद त्यांच्यात आहे. हजारो कोटींचा व्यवहार करणाऱ्या जारकीहोळी यांच्याकडे सर्व कायदेशीर कागदपत्रे उपलब्ध आहेत.

पक्षातील एकजुटीबद्दल बोलताना “काँग्रेसमध्ये कोणताही अंतर्गत वाद नसून सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार पूर्णपणे स्थिर आहे,” असे आमदार आसिफ सेठ यांनी म्हटले.


Recent Comments