Khanapur

बीडी प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Share

खानापूर तालुक्यातील बीडी प्राथमिक आरोग्य केंद्रात केएलई कॅन्सर हॉस्पिटलतर्फे सर्वसामान्यांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभागी होऊन स्थानिकांना आरोग्य सेवा पुरविल्या.

बीडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित या मोफत शिबिरात नागरिकांची रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर), शारीरिक तपासणी आणि मुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणी करून योग्य उपचार व सल्ला देण्यात आला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश किवडसन्नवर आणि बीडी आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पै यांच्यासह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. बेळगावहून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीचा बीडी आणि परिसरातील ग्रामस्थांनी लाभ घेतला.

Tags: