बेळगाव येथील इंद्रप्रस्थ नगरमधील श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात इंडियन कराटे क्लब आणि बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनच्या वतीने कराटे कलर बेल्ट परीक्षा व ब्लॅक बेल्ट प्रदान सोहळा पार पडला.


या सोहळ्यात एकूण १११ कराटे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हिंदळगा शाखेत गेल्या सात-आठ वर्षांपासून खडतर प्रशिक्षण घेतलेले प्रेम होनगेकर, कीर्ती नाईक, अपेक्षा पाटील, मयुरी मळवी, प्रेम हसनन्नवर, अमृता चौधरी, ओंकार कारेकर आणि अंबिका यादव या आठ विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. जपानी काता, लाठी, सिंगल स्टिक तंत्रे, टाईल्स फोडणे आणि आत्मसंरक्षण या विभागांतील कामगिरीची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला. मुख्य परीक्षक शिहान गजेंद्र बी. काकतीकर यांनी ही परीक्षा घेतली.


कार्यक्रमात कराटे कोच गजेंद्र काकतीकर आणि लेडी चीफ इन्स्ट्रक्टर हेमलता काकतीकर यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करण्यात आला. भाजप नेते किरण जाधव, शहापूर पोलीस ठाण्याचे सीपीआय सिद्धप्पा एस. शिमाणी, बीईएमसीओचे वरिष्ठ जीएम सतीश नाईक आदी मान्यवरांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थी व पालकांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेडी चीफ इन्स्ट्रक्टर हेमलता काकतीकर व इतर प्रशिक्षकांनी परिश्रम घेतले.


Recent Comments