Belagavi

सतीश जारकीहोळींवर परदेशात गुंतवणुकीचा झालेला आरोप असत्य: भालचंद्र जारकीहोळींचे स्पष्टीकरण

Share

आमदार सतीश जारकीहोळी यांची परदेशात कोणतीही गुंतवणूक नसून त्यांच्यावरील आरोप पूर्णपणे असत्य आहेत, असे स्पष्टीकरण अरबभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी दिले.

राहुल जारकीहोळी, प्रियंका जारकीहोळी आणि महादेवी यांनी प्रत्येकी अवघी २५ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. खोट्या बातम्या पसरवून आमच्या कुटुंबाची बदनामी करू नये, असे ते म्हणाले. गोकाक येथील सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भालचंद्र जारकीहोळी म्हणाले की, घरातून जप्त करण्यात आलेल्या १.७३ कोटी रुपयांचा पूर्ण हिशोब उपलब्ध असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही रक्कम सोडवून घेतली जाईल. ही एक सामान्य धाड असून यामागे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा कोणताही हात नाही. गेल्या ३० वर्षांपासून दोघांमध्ये मैत्री असून त्यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत.

मे महिन्यात ईडीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर जूनमध्ये मंजुनाथ यांच्या घरावर आणि आता सतीश जारकीहोळी यांच्या घरावर ही कारवाई झाली आहे. केवळ २५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीसाठी धाड टाकल्याचे पाहून आश्चर्य वाटले. या कारवाईला राजकीय रंग देण्याची गरज नाही. कौटुंबिक बाबतीत आम्ही सगळे एकच आहोत, असे सांगत त्यांनी भाजप आमदार नसून कौटुंबिक कर्तव्य म्हणून येथे आल्याचे स्पष्ट केले.

Tags: