Khanapur

खानापूरचे आरएफओ श्रीकांत पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

Share

खानापूरचे वनक्षेत्रपाल (RFO) म्हणून गेल्या तीन वर्षांत उत्कृष्ट सेवा बजावणारे अधिकारी श्रीकांत पाटील हे शासकीय सेवेतून निवृत्त झाले. या पार्श्वभूमीवर वनविभाग व स्थानिक नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. वन आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा मान्यवरांनी गौरव केला.

खानापूर तालुक्यात आपल्या तीन वर्षांच्या सेवाकाळात श्रीकांत पाटील यांनी अरण्य संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनात मोठे योगदान दिले. नियमांचे काटेकोर पालन करत त्यांनी शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले. ‘झाडे लावा, देश वाचवा’ हा संदेश केवळ शब्दांत न ठेवता प्रत्यक्ष कृतीत आणणारा अधिकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली.

सेवानिवृत्त होणाऱ्या या धडपडी अधिकाऱ्याच्या पुढील आयुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. या सत्कार व निरोप समारंभाला वनविभागाचे कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी श्रीकांत पाटील यांचा नागरी सत्कार करून त्यांना भावी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

अल्ताफ एम. बसरीकट्टी
इन न्यूज, खानापूर

Tags: