कंग्राळी येथील इन्फिनिटी एज्युकेशन सेंटरच्या संचालिका संगीता पाटील यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेबद्दल ‘बेला टीचर्स अवॉर्ड २०२६’ देऊन गौरविण्यात आले. ग्रामीण विद्यार्थ्यांना दूरस्थ व संगणक शिक्षण देणाऱ्या त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.

‘इन्फिनिटी एज्युकेशन अँड रुरल फाउंडेशन’अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या केंद्राद्वारे १० वी, पीयूसी, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे दूरस्थ शिक्षण तसेच रोजगाराभिमुख संगणक कौशल्ये शिकवली जातात. संगीता पाटील यांच्या या योगदानाबद्दल आयोजित सोहळ्यात बॉलिवूड अभिनेते सुदेश बेरी, बेलाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी खिलारी, एम. मुखर्जी, मनजीत जैन आणि भारती खिलारी यांच्या उपस्थितीत त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला.



Recent Comments