बेळगाव शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी अत्याधुनिक ‘इन्स्टा रोड पॅचर’ या नवीन तंत्रज्ञानावर आधारित वाहनाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. पीबी रोडजवळ बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, महापौर आणि उपमहापौर यांच्या उपस्थितीत या यंत्राचे पूजन करून कामास सुरुवात करण्यात आली.

पावसाळ्याच्या दिवसांत शहरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडत असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हे आधुनिक पॅचवर्क यंत्र दाखल करण्यात आले आहे. विशेषतः बेळगाव दक्षिण मतदारसंघातील रस्त्यांवर पडलेले खड्डे जलद गतीने बुजवण्यासाठी ही सोपी आणि प्रभावी यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.

या यंत्राच्या साहाय्याने ‘कोल्ड डांबरीकरण’ करून प्रत्यक्ष खड्डा बुजवून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यामुळे पावसाळ्यातही रस्त्यांच्या डागडुजीचे काम वेगाने पूर्ण करणे शक्य होणार आहे.




Recent Comments