बेळगाव जिल्ह्यातील गजपती गावाला कर्नाटक शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष चुन्नप्पा पुजारी यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. चालू हंगामात उसाच्या दरात वाढ करण्यात यावी, अशी जोरदार मागणी त्यांनी सरकारकडे केली.

चालू वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची माहिती त्यांनी घेतली. वाढत्या उत्पादन खर्चामुळे उसाला योग्य आणि परवडणारा दर निश्चित करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे सांगत यावर लवकरच योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चुन्नप्पा पुजारी यांनी दिला.

चुन्नप्पा पुजारी यांचे गावात आगमन झाले असता गावातील शेतकरी नेत्यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांचे जंगी स्वागत केले. या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नेते रमेश गौडर पाटील, चन्नबसप्पा लंगोटी, मडीवाळेश्वर मठाचे प्रशांत स्वामीजी, बसवराज करडी आणि युवा शेतकरी कार्यकर्ते संजू लंगोटी यांच्यासह इतर उपस्थित होते.



Recent Comments