खानापूर तालुक्यातील बिळकी गावातील रुद्रस्वामी मठात आयोजित महाआरती व पूजा कार्यक्रमात स्थानिक आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सपत्निक हजेरी लावून स्वामीजींचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी तालुक्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुख-शांतीसाठी प्रार्थना केली.

या धार्मिक कार्यक्रमात आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सपत्निक सहभाग घेऊन विशेष पूजा-अर्चा केली. याप्रसंगी बोलताना आमदारांनी सांगितले की, मठांची धार्मिक परंपरा समाजात एकता आणि बंधुभाव निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

तालुक्यातील सर्व नागरिकांना सुख, शांती, समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना त्यांनी केली. या पूजेला गावातील ज्येष्ठ नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेकडो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments