Belagavi

यमकनमर्डी पोलिस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन

Share

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी पोलीस ठाण्याचे सीपीआय जावेद मुशापुरी यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत पोलीस दलासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बोलताना सीपीआय जावेद मुशापुरी यांनी २०२५ च्या गणेशोत्सवात कोणतीही अनुचित घटना न घडता शांततेत उत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ५ हजार रुपयांचे रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवले.

यंदाच्या गणेशोत्सवात डिजे आणि मोठ्या आवाजाच्या यंत्रणांऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा, तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी त्यांनी शैक्षणिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाची घोषणा केली. २०२६ च्या दहावीच्या (SSLC) परीक्षेत ६२५ पैकी ६२५ गुण मिळवणाऱ्या यमकनमर्डी मतदारसंघातील विद्यार्थ्याला वैयक्तिकरीत्या १ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल, असे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांमधून विशेष कौतुक होत आहे.

Tags: