खानापूर तालुक्यातील जामगाव खानापूर बस खानापूरकडे येत असताना रविवारी दि.६ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास तेरेगाळी क्राॅस ते शिरोलीनाका दरम्यान रस्त्याच्या उतारतीला असताना रस्त्यावर मोठ मोठे खड्डे असल्याने खड्यात बस गेल्याने स्टेअरिंगचा जाॅईट तुटला आणि बस चालकाचे नियंत्रण सुटन बस रस्त्याच्या कडेला वळली व रस्ता सोडून बाहेर गेली.

दैव बलवत्तर व बसचा वेग कमी असल्याने बस चालका ने बस वर नियमत्रण ठेवून बस थांबविली, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती,
बसचालकाच्या प्रसंगावधनामुळे कोणती जीवित हानी झाली.

# याभागातील रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य! सर्वपक्षीय बैठकीत खड्डे बुजविण्याची केली होती मागणी!
खानापूर हेम्माडगा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी नुकताच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली होती.परंतु याकडे सबंधीत खात्याच्या अधिकार्याचे व लोकप्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष झाल्याने आज बसचा आपघात झाला.
सध्या गणेश उत्सवाची धूमधाम सुरू आहे.सनासाठी परगावी गेलेेले नोकरवर्ग,तसेच पाहुणे गणेशोत्सवासाठी
येणार, तेव्हा यारस्त्यावरील खड्डे बुजवावे.अशी मागणी याभागातील नागरीकातुन होत आहे.


Recent Comments