बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये (मराठा एलआयआरसी) श्रीकृष्ण जन्माष्टमी भक्तिभावाने आणि पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली.

मिलिटरी महादेव मंदिरात आयोजित विशेष पूजेला मराठा एलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये आणि फॅमिली वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा वेदा उपाध्ये यांच्यासह अधिकारी, जवान व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

या प्रसंगी आयोजित आंतर-बटालियन दहीहंडी स्पर्धेत विविध बटालियनच्या संघांनी उत्साहाने सहभाग घेतला. जवानांनी दाखवलेले कौशल्य आणि संघभावना या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले.


Recent Comments