Belagavi

धरनट्टी कुटुंबीयांचे आम. हेब्बाळकर, हट्टीहोळींकडून सांत्वन

Share

करिकट्टी येथील काँग्रेस कार्यकर्ते चनबस्सू धरनट्टी यांच्या कन्येच्या निधनानंतर माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी धरनट्टी यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले.

या वेळी लक्ष्मी हेब्बाळकर आणि चन्नराज हट्टीहोळी यांनी धरनट्टी कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. कन्या गमावण्याचे दुःख मोठे असून या कठीण प्रसंगात आपण कुटुंबीयांसोबत असल्याचे सांगत त्यांनी ईश्वराकडे प्रार्थना केली.

या प्रसंगी काडा अध्यक्ष युवराज कदम यांच्यासह स्थानिक काँग्रेस नेते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: