बेळगाव ग्रामीण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी नावलगट्टी यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

या प्रसंगी लक्ष्मी हेब्बाळकर आणि चन्नराज हट्टीहोळी यांनी नावलगट्टी कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. आईचे छत्र हरपणे ही अत्यंत दुःखद बाब असून या कठीण प्रसंगात आपण कुटुंबीयांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी काडा अध्यक्ष युवराज कदम यांच्यासह स्थानिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



Recent Comments