Belagavi

शिक्षक दिनानिमित्त मूकबधिर शाळेला क्रीडा साहित्याचे वाटप

Share

बेळगाव येथील आयटीआय कॉलेजचे प्राध्यापक आणि समाजसेवक प्रसाद चौगुले यांनी ऑटो नगर येथील अजय मूकबधिर शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना व्हॉलीबॉल आणि नेटचे वाटप करत शिक्षक दिन साधेपणाने साजरा केला

बेळगाव येथील ऑटो नगरमधील अजय मूकबधिर शाळेत शिक्षक दिनानिमित्त बेळगाव आयटीआय कॉलेजचे प्राध्यापक आणि समाजसेवक प्रसाद चौगुले यांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने व्हॉलीबॉल आणि नेट क्रीडा साहित्य म्हणून भेट दिले. या कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य पी वाय पडेन्नवर, एस बी गुडकर, बी बी पाटील, वॉर्डन एस एस मोरे आणि शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: