देशभरात उत्साहात साजरा होणारा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातही मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.

बैलहोंगल तालुक्यातील तिगडी येथील सरकारी मॉडेल प्राथमिक कन्नड शाळेत विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाची वेषभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीच्या या पावन दिवशी श्रीकृष्णाच्या बालरूपाचे स्मरण करत, शाळेतील लहान लहान मुला-मुलींनी राधा आणि कृष्णाचे नयनरम्य पेहराव परिधान केले होते.

हातात बासरी घेऊन बाळकृष्णाच्या रूपात नटलेली मुले आणि पारंपरिक पोशाखातील चिमुकल्या राधा यांना पाहून उपस्थित शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी कौतुक व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या या सुंदर सादरीकरणामुळे साक्षात राधा-कृष्णच शाळेत अवतरल्याचा भास होत असल्याने जन्माष्टमीच्या उत्साहात अधिकच भर पडली.


Recent Comments