Khanapur

शिक्षक दिनानिमित्त खानापूर आणि नंदगड येथे रक्तदान शिबिर

Share

शिक्षक दिनाचे औचित्य साधून खानापूर आणि नंदगड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले असून नागरिकांनी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी रक्तदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

खानापूर येथील पट्टण पंचायत मंगल कार्यालय आणि नंदगड समुदाय आरोग्य केंद्रात शिक्षक दिनानिमित्त स्वेच्छा रक्तदान शिबिर पार पडले. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शिबिराचे उद्घाटन करून रक्तदात्यांचे कौतुक केले.

रक्तदान ही काळाची गरज असून त्याबद्दल नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश किवडसन्नवर यांनी सांगितले.

बेळगाव जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो दात्यांनी नोंदणी केली आहे. या उपक्रमाची नोंद नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होईल असा विश्वास आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Tags: