श्रावण महिन्यातील मेंढ्यांच्या जत्रेदरम्यान झालेल्या वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे घाबरलेल्या मेंढ्या-शेळ्या जवळच्या कालव्यात पडल्या. या घटनेत ७५ मेंढ्या आणि ५ शेळ्यांचा बुडून मृत्यू झाला.

मूडलगी तालुक्यातील यादवाड येथे दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यानिमित्त मेंढ्यांची जत्रा भरविण्यात आली होती. रात्री अचानक वादळी वारा, पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे जनावरे घाबरली आणि जवळच्या कालव्यात पडली. या दुर्घटनेत गरीब मेंढपाळांच्या ७५ मेंढ्या आणि ५ शेळ्यांचा मृत्यू झाला.

जनावरे गमावल्याने मेंढपाळ कुटुंबीयांवर संकट ओढवले. घटनेची माहिती मिळताच युवा नेते सर्वोत्तम जारकीहोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पीडित कुटुंबीयांना धीर देत सरकारकडून शक्य तितक्या लवकर योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


Recent Comments