Khanapur

खानापूरच्या अळणावर आरोग्य केंद्र सुधारण्यासाठी यू. टी. खादर यांना निवेदन

Share

खानापूर सीमाभागातील अळणावर तालुक्यातील समुदाय आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवून गरीब रुग्णांना आपत्कालीन उपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करत काँग्रेस नेते तमीम तेरगाव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बंगळुरूत माजी विधानसभा अध्यक्ष व मंत्री यू. टी. खादर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

अळणावर नगर पंचायतीचे माजी सदस्य तथा काँग्रेस नेते तमीम तेरगाव यांनी आरोग्य मंत्री यू. टी. खादर यांच्याशी सीमाभागातील आरोग्य समस्यांवर सविस्तर चर्चा केली. खानापूरच्या सीमाभागातून मोठ्या संख्येने रुग्ण आपत्कालीन उपचारासाठी अळणावर येथे येतात. मात्र, तेथे पुरेशा सुविधा नसल्याने रुग्णांना पुढील उपचारासाठी हुबळी येथील केएमसी रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे जंगलभागातील गरीब रुग्णांच्या हितासाठी हे आरोग्य केंद्र अद्ययावत करावे, अशी विनंती त्यांनी केली.

या प्रसंगी अन्वर खान बागेवाडी, नियाझ मोहम्मद तोलगी आणि मक्तूम साब हुली हे प्रमुख उपस्थित होते.

Tags: