विजयपूर जिल्ह्यातील निडगुंदी तालुक्यातील बाळबट्टी गावात उघड्या विहिरीत पाय घसरून पडलेल्या दोन चिमुकल्या मुलींना वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

बाळबट्टी येथील शेतातील घराजवळ असलेल्या उघड्या विहिरीत साक्षी (१५) आणि रक्षिता (१०) या दोन मुली अचानक पाय घसरून पडल्या. मुलींना विहिरीत पडल्याचे पाहताच वडील साबण्णा (४०) यांनी क्षणाचाही विचार न करता त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पोहता येत नसल्याने तिघेही पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती मिळताच निडगुंदी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पाण्याचा साठा मोठा असल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने नावेद्वारे तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या घटनेमुळे बाळबट्टी गावात हळहळ व्यक्त होत आहे.


Recent Comments