माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचा वाढदिवस खानापुरात समर्थकांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत नागरिकांना रोपांचे वाटप करून सार्थकी शुभेच्छा देण्यात आल्या.


खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक नंदगड येथील संगोळ्ळी रायण्णा चौकाजवळ एआयसीसी सचिव तथा माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचा वाढदिवस समर्थकांनी अर्थपूर्णरीत्या साजरा केला. पर्यावरण वाचवा आणि झाडे जगवा असा संदेश देत नागरिकांना मोफत रोपांचे वाटप करून पर्यावरणपूरक वातावरणाची निर्मिती करण्यात आली. याप्रसंगी पंच गॅरंटी योजना अंमलबजावणी प्राधिकरणाचे सदस्य बाबू हत्तरवाड, इसाक खान पठाण, मुदकप्पा गोडदोड, अमर दोड्डमणी, रमेश खनगावी, किरण तेगूर, प्रसाद लोकोळ्ळी, शंकर बोटेकर, परशुराम हळब, निंगप्पा सनदी, सुनील दोड्डमणी, कल्लाप्पा हळब, नागराज पेटनेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.



Recent Comments