केएसआरटीसी बसमध्ये खासगी व्यक्तीकडून प्रवाशांना तिकीट दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी जाब विचारणाऱ्या समाजसेवकाला बसचालकाने शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल येथून बेळगावला जाणाऱ्या केएसआरटीसी एक्सप्रेस बसमध्ये हा प्रकार घडला आहे. बसमध्ये परिवहन महामंडळाचा कर्मचारी नसलेली खासगी व्यक्ती प्रवाशांना तिकीट वाटप करत असल्याचे दिसून आले. या गैरप्रकाराबाबत समाजसेवक बाबू पाटील यांनी जाब विचारला असता, बसचालकाने त्यांना सार्वजनिकरीत्या शिवीगाळ करत अरेरावी केली.

या सर्व प्रकाराचे चित्रीकरण उपस्थितांनी मोबाईलमध्ये कैद केले असून, हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या घटनेमुळे इतर बसमध्येही असा बेकायदेशीर कारभार सुरू आहे का, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषी चालक व संबंधितांवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समाजसेवक बाबू पाटील यांनी दिला आहे.


Recent Comments