नागपंचमीच्या दिवशी सर्वत्र भक्तिभावाने पूजा केली जात असताना बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नंदगड गावात एक अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.

नंदगड येथील रहिवासी बसवराज काकती यांच्या घराच्या मागच्या भागात बसलेल्या एका फुलपाखराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नागपंचमीच्या दिवशीच दारात आलेल्या या फुलपाखराच्या पंखांवर स्पष्टपणे नागमोडी सापासारखी आकृती दिसून आली. हे दृश्य पाहून पहिल्याच नजरेत प्रत्यक्ष नागराज बसल्याचा भास होत होता.

सण आणि नागपंचमीचा दिवस असल्याने साक्षात् नागराजानेच फुलपाखराच्या रूपात दर्शन दिल्याचा भाव गावकऱ्यांनी व्यक्त केला. ही दुर्मिळ आणि आकर्षक फुलपाखराची प्रतिकृती पाहण्यासाठी नंदगडमधील नागरिकांनी गर्दी केली होती.


Recent Comments