Khanapur

खानापूर भाजप कार्यालयात ‘हर घर तिरंगा’ बैठक

Share

खानापूर येथील भाजप कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे नियोजन करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

खानापूर भाजप कार्यालयात आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या उपस्थितीत ‘हर घर तिरंगा’ अभियानासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या प्रसंगी आमदारांनी तालुक्यातील प्रत्येक घरात देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले.

ऑगस्ट १३ ते १५ दरम्यान सर्वांनी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज उभारावा आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करावेत, असे आवाहन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले. तालुक्यातील बूथ स्तरावर ध्वज पोहोचवण्याची व्यवस्था केली जात असून कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हे अभियान यशस्वी करावे, असे सांगण्यात आले.

या बैठकीस तालुका भाजप अध्यक्ष बसवराज साणिकोप्प, प्रमोद कोचेरी, सुरेश देसाई, बाबूराव देसाई आणि चेतन मणेरीकर यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: