खानापूर तालुक्यातील बीडी येथील तेरेसा राणी हिने बेळगावच्या एसबीजी आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएस परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला असून, याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला.

बेळगाव येथील प्रतिष्ठित एसबीजी आयुर्वेद महाविद्यालयातून तेरेसा राणी हिने उत्कृष्ट गुण मिळवत बीएएमएस परीक्षेत प्रथम स्थान प्राप्त केले आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण खानापूर तालुक्यातून कौतुक होत असून कर्नाटक रक्षण वेदिकेकडून तिचा विशेष सन्मान करण्यात आला.

कर्नाटक रक्षण वेदिकेचे बेळगाव जिल्हा संघटना सचिव आरोग्यप्पा पादनकट्टी यांची तेरेसा ही कन्या आहे. तिच्या या कामगिरीबद्दल करवेचे तालुका अध्यक्ष विठ्ठल हिंडलकर यांनी तिचे विशेष कौतुक केले आहे.
मागासलेला तालुका अशी ओळख असलेल्या खानापूरचे नाव वैद्यकीय क्षेत्रात उज्वल केल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी अभिमान व्यक्त केला. तालुक्यातील इतर विद्यार्थ्यांनीही असाच आदर्श घेऊन पुढे यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या सत्कार समारंभास दशरथ जनोशी, बिष्टप्पा बनोशी, पत्रकार शशीकांत तळवार यांच्यासह विविध कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.


Recent Comments