दलित व्यक्ती निंगप्पा मादर यांच्या हत्येचा तपास पोलिसांनी योग्य प्रकारे न केल्याचा आरोप करत कुंभारकोप्पच्या ग्रामस्थांनी आणि दलित संघटनांनी धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः भेट द्यावी या मागणीसाठी मुख्य प्रवेशद्वार ढकलून आवारात प्रवेश केला. यामुळे काही काळ पोलिसांशी बाचाबाची होऊन तणाव निर्माण झाला होता.

गेल्या सप्टेंबर महिन्यात अळणावर तालुक्यातील कुंभारकोप्प गावात निंगप्पा मादर यांची विजेचा धक्का देऊन हत्या करण्यात आली होती. मात्र, अळणावर पोलिसांनी हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगत गुन्हा दाखल केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाचा तात्काळ निष्पक्ष तपास न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.


Recent Comments