नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट परीक्षा गैरव्यवहार व इतर परीक्षांमधील घोटाळ्यांविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या प्रयोगाचा विजापूर येथील पुरोगामी वकिलांनी तीव्र निषेध केला आहे.


विजापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकत्र येत पुरोगामी वकिलांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या या कारवाईविरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. लोकशाहीत शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न निषेधार्ह असल्याचे वकिलांनी म्हटले.


सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन आणि सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स-ऑन-रेकॉर्ड असोसिएशनसह देशातील ६५० हून अधिक वरिष्ठ वकील आणि संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुरोगामी वकिलांच्या संघटनेने केली आहे.


Recent Comments