गंधिगवाड येथील परम ज्योती हायस्कूलच्या २००२, २००३ आणि २००४ च्या तुकडीतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत ‘गुरुवंदना व स्नेहसंमेलन’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व शिक्षकांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.


परमपूज्य मृत्युंजय महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात आणि ॲड. उमेश मुलीमनी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.

सत्कारमूर्ती निवृत्त प्राध्यापक पी. वाय. पाटील म्हणाले, “अनेक वर्षांनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांची आठवण ठेवून असा सत्कार करणे भूषणावह आहे. जीवनात यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी गुरुंचा आशीर्वाद सर्वात महत्त्वाचा असतो.”

या प्रसंगी निवृत्त शिक्षक एस. जी. कुलकर्णी, एस. आर. एम्मी, बी. व्ही. मुलीमनी, पी. एस. हुलमनी, एल. एस. कुंदेकर, बी. बी. करवीरनवर, रुद्रप्पा कोलकार आणि एन. एस. नाईक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रा. विजय इटगी आणि सविता टकाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या सोहळ्याला प्रा. शिवानंद मुलीमनी, एम. एस. नाईक यांच्यासह सर्व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments