Uncategorized

पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी बेळगावातील एफएफसी टीमकडून अन्नदान

Share

बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमने विविध संघटना आणि माजी सैनिकांच्या सहकार्याने पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी अन्न आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली.

फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमने वारी बेळगावात असताना तसेच पंढरपूर येथे वारकऱ्यांना अन्न आणि पाण्याचे वाटप केले. टिळकवाडी येथील लेले मैदानापासून या उपक्रमाची सुरुवात झाली. हॉकी बेळगावच्या युवा खेळाडूंनीही यात सहभाग घेतला.

या संपूर्ण वाटपाची जबाबदारी माजी सैनिकांच्या पथकाने सांभाळली. पंढरपूर येथे सुधाकर चाळके आणि मनोहर पाटील यांच्या नेतृत्वात माजी सैनिकांनी प्रसादाचे वाटप केले.

बेळगावात सुरू झालेला हा उपक्रम आज पंढरपूरपर्यंत पोहोचून सेवेच्या रूपात साकार झाला असल्याचा आनंद संतोष दरेकर यांनी व्यक्त केला.

Tags: