बेळगावचे नवनियुक्त तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांचे बेळगाव तालुका ग्रामीण आणि शहरी डॉक्टरांच्या पथकाकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या स्वागत प्रसंगी डॉ. सलीमा नदाफ, डॉ. प्रशांत, डॉ. शौश्मा, डॉ. अर्पिता, डॉ. कृष्णा, डॉ. शिवप्रभू यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

डॉ. संजीव नांद्रे यांनी यापूर्वी खानापूर तसेच बेळगाव महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. एक दक्ष आणि कुशल प्रशासक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून, आता त्यांची बेळगाव तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले.
अल्ताफ एम. बसरीकट्टी
इन न्यूज खानापूर


Recent Comments