हुक्केरी येथील टिपू सुलतान संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील पीयूसी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. याच कार्यक्रमात महाविद्यालयाच्या सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांंचेही उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना बेळगाव जिल्हा मुस्लिम कल्याण आणि शिक्षण संस्थेचे अध्यक्ष इक्बाल पीरजादे यांनी, विद्यार्थ्यांनी संस्थेमार्फत मिळणाऱ्या सर्व सुविधांचा आणि मोफत पुस्तकांचा पुरेपूर लाभ घेऊन आपले करिअर घडवावे, असे आवाहन केले. आम्ही दिलेल्या आश्वासनानुसार यंदा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली असून विद्यार्थ्यांनी याचा सदुपयोग करावा, असे त्यांनी म्हटले.


कार्यक्रमाला उपस्थित असलेले बेळगावचे हिशेब तपासणीस नोव्हेल गोळे यांनी मार्गदर्शन करताना, प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी एक निश्चित ध्येय समोर ठेवून पुढील पाच वर्षे कठोर अभ्यास करावा, तसेच संस्था आणि पालकांचे नाव उज्वल करून आदर्श नागरिक बनावे, अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संस्थेचे सचिव ॲड. शाहीदरजा पीरजादे, प्राचार्य बी. एस. अरबंभावी आणि नशीम मौलाना उपस्थित होते. याप्रसंगी संचालक मंडळाचे सदस्य कलंदर मोकाशी, एम. आर. मोकाशी, डी. आर. खाजी, मुनाफ पीरजादे, हसन मुजावर यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Recent Comments