बागलकोट जिल्ह्यातील बीळगी येथील श्री दुर्गादेवी महिला ग्रामीण विकास संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. महिलांनी संस्थेच्या कार्यालयाला वेढा घातल्यानंतर पोलिसांनी तपास तीव्र करत हा कारवाईचा बडगा उचकला.

बीळगी पोलिसांनी या फसवणूक प्रकरणाचा सखोल तपास करत तब्बल ४३ लाख ४० हजार रुपयांहून अधिकचा घोटाळा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी संस्थेच्या कार्यालयावर छापा टाकून २०० हून अधिक नोंदवह्या, पावत्या आणि संगणक जप्त केले आहेत.

या प्रकरणी एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आठ जणांची चौकशी केल्यानंतर दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. उर्वरित संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत.
या संस्थेत पैसे गुंतवून फसवणूक झालेल्या नागरिकांनी योग्य कागदपत्रांसह तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे केले आहे.


Recent Comments