खानापूर तालुक्यातील नंदगड गावात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेची तहसीलदार दुंडप्पा कोमार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. ही प्रक्रिया अत्यंत सुव्यवस्थित आणि अचूक पद्धतीने राबवण्याबाबत त्यांनी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला आवश्यक मार्गदर्शन केले.

नंदगड गावाच्या भेटीदरम्यान तहसीलदार दुंडप्पा कोमार यांनी एसआयआर मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेत कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. सार्वजनिक स्तरावर नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि ही प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीला महसूल विभागाचे जावेद खान, ग्राम प्रशासनाधिकारी महेश बुरुड, ग्राम सहाय्यक इब्राहिम यांच्यासह बीएलओ मोहन केळगेरी आणि कावेरी नाईक उपस्थित होते.



Recent Comments