बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर मतदारसंघातील नेगीनहाळ ते संपगावी गावाला जोडणाऱ्या राज्य महामार्गावरील ब्रिटिशकालीन जीर्ण पूल हटवून नवीन पूल निर्माण करण्याच्या कामाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते अधिकृत भूमिपूजन करण्यात आले.


मागील वर्षी या राज्य महामार्गाचे नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र, रस्त्यावरील ब्रिटिशकालीन जुना पूल अत्यंत दुरवस्थेत असल्याने तो कधीही कोसळण्याची भीती होती. यापूर्वी अनेक लोकप्रतिनिधींकडे आणि अधिकाऱ्यांकडे वारंवार मागण्या करूनही या पुलाचे काम मार्गी लागले नव्हते.


आमदार बाबासाहेब पाटील यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी ही समस्या मांडताच त्यांनी शासकीय पातळीवर पाठपुरावा करून सुमारे ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. आज भूमिपूजन पार पडल्यानंतर आमदारांनी कामाचा दर्जा उत्तम ठेवून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. वर्षानुवर्षांची ही गंभीर समस्या सुटल्याने संपगावी आणि नेगीनहाळ ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.


Recent Comments