कृष्णा नदीच्या वरच्या भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे अलमट्टी धरणातील पाण्याच्या आवकेत वाढ झाली असून, मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत धरणात सरासरी २१,६२५ क्युसेक पाणी जमा होत आहे.

सध्या धरणाची पाणीपातळी ५०८.२८ मीटर नोंदवली गेली असून, एकूण पाणीसाठा २२.४६० टीएमसी तर जिवंत पाणीसाठा ४.८४ टीएमसी इतका आहे. या धरणाची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता १२३.०८१ टीएमसी (५१९.६० मीटर) एवढी आहे.

सध्या धरणातून सिंचनासाठी किंवा तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्यात आलेले नाही. मात्र, केपीसीएल (KPCL) कडून जलविद्युत निर्मितीसाठी १०० क्युसेक पाणी वापरले जात असून, मुख्य सांडव्यावरून (स्पिलवे) अद्याप पाणी सोडण्याची आवश्यकता भासलेली नाही. बाष्पीभवन आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजेसाठी ४४५ क्युसेक पाण्याचा वापर होत आहे. धरणातून सध्या एकूण ५४५ क्युसेक पाणी बाहेर पडत असून, येत्या काही दिवसांत पाण्याची आवक अशीच राहिली तर धरणाची पातळी लक्षणीयरित्या वाढण्याची शक्यता आहे.


Recent Comments