Uncategorized

बांधकाम कामगारांच्या शिष्यवृत्तीसाठी धारवाडमध्ये निदर्शने

Share

बांधकाम कामगारांच्या मुलांची थकीत शिष्यवृत्ती त्वरित मंजूर करावी यासह विविध मागण्यांसाठी धारवाडमध्ये कामगारांनी तीव्र आंदोलन करत राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला. ‘एआययूटीयूसी’ संघटनेच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या बांधकाम कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून प्रशासनाचा निषेध केला.

आंदोलनकर्त्या कामगारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मांडल्या. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या किटची आम्हाला गरज नाही, त्याऐवजी गेल्या २ वर्षांपासून प्रलंबित असलेली आमच्या मुलांची शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. जुन्या दरानेच ही थकीत रक्कम बँक खात्यात जमा करावी आणि कामगारांच्या सर्व घोषित हक्कांची पूर्तता करावी, या मागणीचे निवेदन कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला सादर केले.

Tags: