वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील नेरली गावातील ग्रामस्थांनी शुक्रवारी एका अनोख्या परंपरेद्वारे पावसासाठी साकडे घातले.

राज्यात मान्सूनचा पाऊस लांबल्याने बळीराजाची चिंता कमालीची वाढली आहे. पावसाअभावी शेतातील पिके सुकून जाण्याची भीती निर्माण झाली असून दुष्काळाचे सावट पसरले आहे. या पार्श्वभूमीवर, हुक्केरी तालुक्यातील नेरली येथील ऐतिहासिक नीलकंठेश्वर मंदिरात ग्रामस्थांनी एकत्र येत विशेष जलाभिषेक केला. मंदिराच्या संपूर्ण गाभाऱ्यात पाणी भरून, महादेवाला अभिषेक करत लवकरात लवकर उत्तम पाऊस पडू दे, अशी प्रार्थना करण्यात आली.

मान्सूनच्या भरवशावर शेतकऱ्यांनी आधीच पेरण्या पूर्ण केल्या आहेत, मात्र आता पाऊस गायब झाल्याने पिके करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास आगामी दिवसांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे. नीलकंठेश्वर देवाला असा जलाभिषेक केल्यास पाऊस पडतो, अशी ग्रामस्थांची दृढ श्रद्धा असल्याने हा विशेष पूजाविधी करण्यात आला.


Recent Comments