बेळगाव येथे २२ जून रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कन्नड सक्तीविरोधी आंदोलनाची हाक दिली असून या आंदोलनाला प्रशासनाने परवानगी देऊ नये, अशी मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेने चिकोडी प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे.

करवेचे चिकोडी तालुका अध्यक्ष संजू बडिगेर यांनी म. ए. समितीच्या या नियोजित मोर्चावर आक्षेप घेत मराठी भाषिकांना प्रशासनाविरोधात चिथावणी देणाऱ्या नेत्यांना तात्काळ महाराष्ट्रात हद्दपार करावे आणि या मोर्चाला मंजुरी देऊ नये, अशी मागणी केली आहे.

दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत हुक्केरी यांनी जर प्रशासनाने म. ए. समितीच्या मोर्चाला परवानगी दिली, तर त्याच दिवशी कर्नाटक रक्षण वेदिकेचे लाखो कार्यकर्ते बेळगावात स्वाभिमान रॅली काढतील, अशी वल्गना त्यांनी केली.
याप्रसंगी करवेचे स्थानिक नेते मोहन पाटील, लक्ष्मीकांत खोत, अमोल नावी उपस्थित होते.


Recent Comments