goa

बेळगावात गोवा बनावटीची अवैध दारू जप्त

Share

विसर्जन मिरवणुकीत दारूबंदीचा आदेश लागू असताना गोव्यातून बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक केली जात असल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

बेळगावात गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात दारूबंदी जाहीर करण्यात आल्याने, गोव्यातून बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक केली जात होती. याचवेळी उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत ५० बॉक्स दारूसह एक कार आणि दुचाकी जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे, तर त्याचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

बेळगाव तालुक्यातल्या राकसकोप्पा गावाजवळ ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेळगाव शहराच्या दिशेने येणाऱ्या एका कारला अडवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी, कारमधील दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले, तर तिसऱ्या आरोपीला अधिकाऱ्यांनी पकडले. पकडलेल्या आरोपीची ओळख बादरवाडी येथील बाळू सातेरी अशी झाली आहे. त्याच्याकडून कार, ५० बॉक्स दारू आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी बेळगाव उत्पादन शुल्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: