Bagalkot

बागलकोटमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संकटात : महापुरामुळे कांद्याचे पीक पाण्याखाली

Share

बघता बघता डोळ्यासमोर कांद्याचे पीक पाण्याखाली गेल्याने बागलकोट जिल्ह्यांतील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पिकलेले पीक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांनी डोक्यावर हात ठेवला आहे.

बागलकोट जिल्ह्याला आलेल्या या भयंकर पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे घटप्रभा आणि मलप्रभा नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. या नद्यांच्या काठावरील अनेक भागात पूर आला असून, बदामी तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पिकवलेला कांदा पूर्णपणे नष्ट झाला आहे.

येथील शेतकऱ्याच्या शेतात नदीचे पाणी शिरल्याने कांदा पूर्णपणे पाण्यात बुडाला. शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा काही क्षणातच नदीच्या पाण्यात वाहून गेल्याचे दृश्य मन हेलावून टाकणारे आहे. “आमची मेहनत वाया गेली. हाताला लागतोय तेवढा कांदा उपटून काढत आहोत. अद्याप कोणताही संबंधित अधिकारी येथे भेट देण्यासाठी आलेला नाही,” अशी प्रतिक्रिया शेतकऱ्याने व्यक्त केली.

Tags: