पश्चिम घाट आणि बेळगाव परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बागलकोट जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. घटप्रभा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून, नदीत ६५,००० क्युसेक पाण्याची आवक होत आहे. या पुरामुळे मुधोळ आणि रबकवी-बनहट्टी तालुक्यातील ११ पूल पाण्याखाली गेले आहेत, ज्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

या पुरामुळे मुधोळ तालुक्यातील मिर्जी गावात बाधित झालेल्या १२ कुटुंबांतील ६२ लोकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्यासाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. नदीच्या काठावरील हजारो एकरमधील ऊस, मूग, चवळी आणि मका पिके पाण्याखाली गेली आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, जिल्हाधिकारी संगप्पा आणि जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिधर कुरेरा यांनी मुधोळ आणि रबकवी-बानहट्टी तालुक्यांना भेट दिली. “पूरग्रस्तांसाठी योग्य व्यवस्था करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.


Recent Comments