धर्मास्थळ प्रकरणाच्या एसआयटी (SIT) तपासणीमध्ये कोणतेही षड्यंत्र झालेले नाही, असे उत्पादन शुल्क मंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी स्पष्ट केले आहे. धर्मास्थळची प्रतिमा खराब होणार नाही, अशा पद्धतीने एसआयटीने तपास केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

बागलकोटमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री तिम्मापूर म्हणाले, “धर्मास्थळ प्रकरण जेव्हा समोर आले, तेव्हा त्याची प्रतिष्ठा जपण्याचे काम सरकारला करावे लागले. एसआयटीने धर्मास्थळाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली.” उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी धर्मास्थळ प्रकरणात षड्यंत्र असल्याच्या केलेल्या वक्तव्यावर ते म्हणाले, ‘ते असू शकते. यात असे का झाले, काय झाले, हे बाहेर आले पाहिजे.’ सध्या सुरू असलेल्या तपासणीमुळे यात नेमकी कोणाची चूक आहे, हे समोर येईल. सरकार आणि तपास यंत्रणा धर्मास्थळाची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी काम करत आहेत, असेही तिम्मापूर यांनी सांगितले. त्यांनी प्रसारमाध्यमांना यावर अधिक चर्चा करू नये, अशी विनंती केली.
राज्यात बियरचे दर वाढणार का, या प्रश्नावर तिम्मापूर यांनी बियरचे दर वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारपुढे नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘आपल्या राज्यातील बियरचा दर्जा गोवा आणि महाराष्ट्रातील बियरपेक्षा वेगळा आहे. आपल्या बियरचा दर्जा चांगला आहे.’ तसेच, आपल्या राज्यातूनच शेजारच्या राज्यांना स्पिरीटची निर्यात होते, त्यामुळे गोवा आणि महाराष्ट्रातील दर आणि ब्रँडची आपल्या ब्रँडसोबत तुलना करता येणार नाही. माजी मंत्री राजण्णा यांच्या निलंबनावर आणि भाजप राजण्णांची बाजू घेत असल्याच्या प्रश्नावर तिम्मापूर यांनी ‘भाजप यावर केवळ राजकारण करत आहे’, असा आरोप केला.
काँग्रेसमध्ये सत्य बोलणाऱ्यांना स्थान नाही, या भाजपच्या आरोपावर तिम्मापूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘भाजपवाले असे म्हणतात, मग त्यांनी यत्नाळ यांना पक्षातून बाहेर का काढले? यत्नाळ यांना का काढले हे त्यांनी सांगावे. भाजपमध्ये सत्य बोलणाऱ्यांना किंमत आहे का? यत्नाळ यांना पक्षातून काढल्यानंतर कोणीही त्यावर बोलले आहे का? भाजपवाल्यांकडे बोलण्यासाठी नैतिक अधिकार नाही,’ अशी टीका त्यांनी केली.


Recent Comments