मलप्रभा नदीवरील पुलाची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे नदीचे पाणी शेतात शिरले. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाले आहेत.

बागलकोट जिल्ह्यातील बेविनाळ आणि सुरळीकल गावांदरम्यान मलप्रभा नदीवर बांधलेल्या पुलाची संरक्षक भिंत जोरदार प्रवाहामुळे कोसळली. त्यामुळे शेतात पाणी शिरून ऊस व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीची पाणी पातळी वाढत असल्यामुळे गेट उघडण्याची विनंती शेतकऱ्यांनी लघु पाटबंधारे विभागाला केली होती. तीन दिवसांपासून विनंती करूनही अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे नदीचे पाणी वाढून संरक्षक भिंत तुटली आणि ऊस तसेच इतर पिके पाण्याखाली गेली. अधिकाऱ्यांच्या या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे.


Recent Comments