बागलकोट हे एक ऐतिहासिक पर्यटनस्थळ आहे. या पुण्यभूमीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. पण, तीन नद्यांच्या संगमावर बोटिंगचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांची या वर्षी निराशा झाली आहे. कारण, येथील बोटी खराब झाल्या आहेत. याबाबतचा इन न्यूज ने घेतला आधवबा…

एका बाजूला पर्यटकांनी भरलेलं संगमस्थळ, तर दुसऱ्या बाजूला तीन नद्यांच्या संगमावर खराब होऊन उभ्या असलेल्या बोटी. त्यामुळे बोटिंगचा अनुभव घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला. हे चित्र बागलकोट जिल्ह्यातील बसवण्णांच्या समाधीस्थळी, कुडल संगममध्ये पाहायला मिळालं.
खरं तर, कुडल संगम येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. येथील ऐतिहासिक संगम मंदिर आणि बसवण्णांच्या ऐक्य मंटपाच्या दर्शनासोबतच तीन नद्यांच्या संगमावर बोटिंग करणे, पर्यटकांसाठी एक उत्साहवर्धक अनुभव असतो. मात्र, यावर्षी येथील ५ बोटी खराब झाल्या आहेत. बोटिंगसाठी केवळ दोनच बोटी उपलब्ध आहेत. त्यामुळे समूहाने येणाऱ्या पर्यटकांची निराशा होत आहे.
कुडल संगमच्या विकासासाठी एक स्वतंत्र विकास प्राधिकरण असून, एक आयुक्तही आहेत. तरीही, येथील पर्यटन थंडावले आहे. खराब झालेल्या बोटींची दुरुस्ती झालेली नाही. उपलब्ध असलेल्या दोन बोटींवरच जास्त लोक बोटिंग करत आहेत. श्रावण महिन्यात येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटनासाठी येणाऱ्या मुलांना बोटिंगचा अनुभव घेता येत नाहीये. “दोनच बोटी वापरल्यामुळे जास्त गर्दी झाली, तर दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच जागे होऊन पर्यटकांच्या समस्यांवर तोडगा काढायला हवा,” अशी प्रतिक्रिया येथील पर्यटकांनी व्यक्त केली आहे.


Recent Comments