धर्मस्थळाची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बागलकोटमधील भक्तांनी दिला आहे.

हेगडे कुटुंबाची प्रतिष्ठा मलीन करण्याचा कट रचणाऱ्यांवर भक्तांनी संताप व्यक्त केला आहे. आज बगळकोटमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धर्मस्थळ भक्त समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी, धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचा तीव्र निषेध करण्यात आला. नास्तिक व्यक्तींकडून होत असलेल्या या अपप्रचाराचा भक्तांनी तीव्र विरोध केला. ‘सरकारने एसआयटीची स्थापना करून मोठी चूक केली आहे, हे निंदनीय आहे,’ असे भक्त म्हणाले. ‘हा केवळ हेगडे कुटुंबाचा मुद्दा नाही, तर आपल्या धार्मिक श्रद्धेचा विषय आहे. वाईट व्यक्तींवर तातडीने कारवाई झाली पाहिजे. धर्मस्थळाची परंपरा, पवित्रता आणि धर्माधिकाऱ्यांचा आदर राखणे ही प्रत्येक भक्ताची जबाबदारी आहे,’ असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना माजी आमदार विरण्णा चरंतीमठ यांनी, “धर्मस्थळाची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास, पुढील काळात राज्यव्यापी आंदोलन केले जाईल,” असा इशारा दिला.


Recent Comments