Bagalkot

आशा सेविकांचे चिमुकल्यांसह रात्रभर आंदोलन

Share

मानधनात वाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी आशा सेविकांनी आपल्या चिमुकल्यांसोबत बागलकोट येथे रात्रभर आंदोलन केले. बागलकोटमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून आशा सेविकांचे हे धरणे आंदोलन सुरू आहे.

एआययूटीयूसी संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले हे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. लहान मुलांसोबतच रात्रीचे जेवण उरकून त्याच ठिकाणी झोपण्याची वेळ या आंदोलक आशा सेविकांवर आली आहे. यामध्ये मासिक किमान मानधन दहा हजार रुपये करण्याची, योग्य वेतन देण्याची, तसेच निवृत्त झालेल्या आशा सेविकांना पश्चिम बंगालच्या धर्तीवर पेन्शन देण्याची मागणी करण्यात आली आहे. २०२५ मध्ये केंद्र सरकारने घोषित केलेले प्रोत्साहनपर अनुदान राज्यातही लागू करावे आणि शहरी आशा सेविकांना दोन हजार रुपये मानधन द्यावे, अशा मागण्याही त्यांनी केल्या आहेत.

Tags: