पाकिस्तानविरुद्ध आता अधिक कठोर कारवाई केली पाहिजे. पीओके रिकामा करून घेणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत विधान परिषदेचे सदस्य बसवराज होरट्टी यांनी व्यक्त केले.

बागलकोट येथे सोमवारी माध्यमांशी बोलताना होरट्टी म्हणाले, पहलगाम हल्ल्याबाबत आता पूर्ण कठोर पावले उचलायला हवीत. पीओके ताब्यात घ्यावं लागेल, परदेशी नागरिकांना देशाबाहेर हाकलावं लागेल. केंद्र सरकारने युद्धासंबंधी अधिक ठाम भूमिका घ्यावी, देश प्रथम असा दृष्टीकोन ठेवून निर्णायक पावले उचलावीत, अशी त्यांनी सूचना केली.
पीओके मिळवण्यासाठी ज्या योजना आखायच्या आहेत त्यासाठी जपानकडून शिक्षण घ्यावं लागेल. ते एक इंच जमीनही परक्याला देत नाहीत. हजारो कोटी रुपये खर्च करून सीमा सुरक्षित करतात. पण आपल्याकडे कोणीही आत येतं आणि जातं, आपण फक्त टीव्हीवरच बघतो. देशप्रेम अजूनही खूप वाढवायची गरज आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
निर्दोष नागरिकांवर गोळी झाडून ठार मारणं ही फार वेदनादायक बाब आहे, असे सांगत भारतीय महिला पाकिस्तानमधील पुरुशांषीच का लग्न करत आहेत? भारतामध्ये पुरुष नाहीत का? असा सवाल उपस्थित केला. अशा विवाहामागे वेगळ्याच योजना असतात, अशा लोकांना देशात काहीतरी करण्याची योजना असते, स्वतःचं नेटवर्क असतं आणि त्याचा वापर करून हे लोक भारतात येतात, असा आरोप त्यांनी केला. 90 टक्के प्रकरणं गुप्तहेरगिरीशी संबंधित असण्याची शक्यता आहे, असा गंभीर दावाही त्यांनी केला आहे.


Recent Comments