Belagavi

मंत्री हेब्बाळकर वाहन अपघातप्रकरणातील आरोपीला अटक

Share

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या गाडीचा अपघात घडवणारा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडला असून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावचा मधुकर सोमनवंशी याला कित्तूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळील ट्रकही पोलिसांनी जप्त केला आहे.

१४ जानेवारी २०२५ रोजी पहाटे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची गाडी बंगळुरूहून बेळगावला येत असताना कित्तूरजवळील अंबडगट्टी भागात अपघात झाला होता.या घटनेत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार देण्यात आले. तीन महिने अखंडपणे मोहिम राबवलेल्या कित्तूर पोलिसांनी अखेर हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणातील ट्रक चालकाला अटक केली आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावचा मधुकर सोमनवंशी याला अटक करण्यात आली.

अपघात झालेल्या वाहनाचा बाह्य रंगाचा नमुना न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला होता आणि त्याच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला. चालकाला हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणात अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणांमध्ये सहसा ३ ते ७ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता असते. सुनावणीनंतर न्यायालय निर्णय देणार आहे. या अपघातात जीवितहानी झाली नसली, तरी अपघात घडवून पळून जाणे चुकीचेच असल्याचे एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

खानापूर तालुक्यातील बिडी येथील वृद्ध दांपत्याला सायबर फसवणुकीच्या प्रकरणात आरोपींना अटक करण्यासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली असल्याचीही माहिती डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.

Tags: