धामणे गावात क्षुल्लक कारणावरून दोन भावांमध्ये झालेल्या वादाचे परिणाम मोठ्या भावाने लहान भावाच्या खुनात झाले असून बुधवारी सकाळी ११ वाजता ही धक्कादायक घटना घडली.
बुधवारी दुपारी क्षुल्लक कारणावरून लक्ष्मण भरमा बाळेकुंद्री (वय २८) आणि मारुती भरमा बाळेकुंद्री (वय ३०) रा. बसवान गल्ली, धामणेया दोन्ही भावंडांमध्ये वाद झाला. दोन्ही भाऊ व्यसनाधीन असल्याने नशेच्या भरात लहान भावाला मोठ्या भावाने लोखंडी सळईने मारहाण करून ढकलून दिले. यावेळी लक्ष्मण बाळेकुंद्री हा तरुण घरातील कट्ट्यावर जाऊन आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो जागीच कोसळला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यापूर्वीही दोन्ही भावंडांमध्ये सातत्याने असे वाद व्हायचे. काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले असून आई दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. यापूर्वी देखील दोन्ही भावांमध्ये व्यसनाधीनतेमुळे वाद झाले होते. दरम्यान आज झालेल्या वादावादीत एकाचा अंत झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत आरोपी मारुती याला अटक केली आहे.


Recent Comments